Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

Info Post


आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला..

0 comments:

Post a Comment