Breaking News
Loading...
Thursday, 18 February 2010

Info Post
नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

फोन मात्र मीच करायचा,
कसा आहेस ? मात्र तू बोलायचे,
तु दिसलिस की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते
मात्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

0 comments:

Post a Comment