Breaking News
Loading...
Wednesday, 23 March 2011

Info Post
आजकाल सेम कविता/लेख पोस्ट होत आहेत म्हणून मी एक कविता केली आहे. कवितेचा प्रकार मला माहित नाही. तुम्हाला "प्रेमात पडलं की सारेच जण..." हि कविता माहित आहे का? तिचा आधार घेवून मी खालील कविता केली आहे.
- राजश्री

गूगल ग्रुप जॉईन केला कि, सगळे जन कविता कॉपी-पेस्ट करायला लागतात
खर सांगायचं झाल तर आपणच कवी असल्यासारख दाखवतात

यात चुकीचे अस काहीच नाही, सगळ्याच कविता असतात खूप छान
आपल्याला कविता येत नाही.... याचे येते भान

रात्र न दिवस कविता करण्याचे, विचार छळू लागतात
मग आपल्याच मर्यादा ....आपल्याला कळू लागतात

डोळ्याला डोळा लागत नाही, एकाकी रात्री खायला उठतात
ओठावर आलेले शब्द, कवितेत उतरताना मात्र फटकून वागतात.

कठोर वाटणार सत्य हि, हळू हळू स्वीकारतात
खर सांगते  कवी होण्याचे निरनिराळे पर्याय शोधतात

स्वप्नपूर्तीचे मार्ग शोधताना रात्र रात्र जळतात
गूगल ग्रुप जॉईन केला कि, सगळे जन कविता कॉपी-पेस्ट करायला लागतात

साभार - कवियेत्री : राजश्री ( पुणे )


0 comments:

Post a Comment