Breaking News
Loading...
Monday, 12 September 2011

Info Post
स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी…
माझे सर्वस्व अर्पण केले होते मी…
तुझा भास..तुझा सहवास….
तुझ्याच प्रेमात पडले होते मी…

नाही कधी मिळाले मज काही
ना मिळाले काही मज आज..
स्वप्न रंगवत होते आपली…
पण स्वप्नांतील रंगच नाहीसे झाले आज …

खूप ठरवले होते मी स्वत:शीच
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच
संपणार नव्हते ते आज व कधीच..

आज तो मला सोडून गेला होता
काळीज मज काढून निघून गेला
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते….
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेला

तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
मला विसरून जा म्हणालास ...
मग का माझ्यासाठीच का रडलास ….??

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment