Breaking News
Loading...
Monday, 5 March 2012

Info Post
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे

मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस

आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"
बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील

"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय

आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.

0 comments:

Post a Comment