Breaking News
Loading...
Wednesday, 22 August 2012

Info Post
प्रिय मित्रानो

मन माझे तर्फे 15 ऑगस्ट 2012 रोजी मुक्त जीवन सोसायटी मदत योजना उपक्रमाला दिलेल्या अतुलनीय प्रतिसादाबद्दल आणि अनमोल सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद...



१५ ऑगस्ट २०१२ रोजी मन माझे तर्फे वासिंद येथील मुक्त जीवन वस्तीगृह मदत योजना राबवण्यात आली



येथील ५६ चिमुकल्यांची भेट घेण्यात आली .. 


येथील चिमुकली मुले हि दुर्देवाने HIV सारख्या दुर्दम्य आजाराच्या विळख्यात सापडलेली आहेत


चिमुकल्यांनी सर्वांचे गाणे म्हणून स्वागत केले आणि पाहून आनंद झाला 



तेथील सिस्टर रक्षा यांनी आमचे स्वागत करून आम्हाला खूप मदत केली ....


सिस्टर रक्षा यांच्या  बोलण्यातूनच विलक्षण  नम्रपणा आणि प्रेम सर्वांनाच जाणवले 



चिमुकल्यांसाठी केक नेण्यात आलेला आणि त्यांना चोक्लेट्स वाटण्यात आले ..



त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू , चित्रकलेची वही, रंग पेटी , कलर डिश, ब्रश , पेन्सिल , रबर याचे वाटप करण्यात आले


त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली 


वयाप्रमाणे ३ भागामध्ये त्यांची वाटणी करून प्रत्येकी ३ प्रथम , द्वितीय आणि तृतीय पारितोषिक काढण्यात आले 


चीमुक्ल्यांबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत करून सर्वांना खूप प्रसन्न वाटले 



जण गण मन बोलून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 


आणि सर्वांनी गहिवरलेल्या मनाने चिमुकल्यांना निरोप दिला ....



निघताना मन माझे कडून त्यांना छोटीशी मदत म्हणून देणगी  देण्यात आली.

मित्रानो  आपल्यासारख्या सभासदांच्या मदतीमुळे समाज आणखीन आनंदी आणि प्रगतीशील पथावर जाईल याची मला खात्री आहे.


आपल्या प्रेमळ आणि  निसंकोच सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद

आभार
टीम मन माझे 

0 comments:

Post a Comment