Breaking News
Loading...
Saturday, 1 September 2012

Info Post

तुला कितही वेळा भेटलो तरीही,
तुला भेटण्‍याची ओढच कमी होत नाही,

तुझ्या कुशित निजल्‍यावर मन
दुसर काही मागतच नाही.
बागेत बसल्‍यावर तु त्‍या
फुलांकडे पाहत बसते,
माझी नजर मात्र माझ्या
फुलपाखरावरच असते.

तुझा हात हातात घेतल्‍यावर
मी किती समाधानी होतो,
तुझ्या त्‍या अबोल प्रेमात
मी तर चिंब भिजतो.

बागेतुन घरी येण्‍यास
मनच होत नसत,
माझे मन तुझ्या केसात
असे काही गुंतून बसत.

माझ हे रोजचच झाले हे
संध्‍याकाळी निघतांना
तुझ्यापाशी विचित्रच मागण,
ते तुलाही हव हवस असतांना
तरीही मात्र तुझे ते मला नाही म्‍हटण.

बस आता तुझ्यापासुन
एकच मागण आहे.
माझे हे जिवन
तुझ्यावरच अर्पन व्‍हावे,
आणि तुझे प्रेमही माझ्यासाठी
जिवनभर टिकूण रहावे.
आणि तुझे प्रेमही माझ्यासाठी
जिवनभर टिकूण रहावे.


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment