Breaking News
Loading...
Thursday, 25 April 2013

Info Post
"आई माझा हा दात किती दिवसापासून हलतोय? केंव्हा पडणार हा दात?" सलोनीने, माझ्या ५ वर्षाच्या मुलीने मला विचारले.
"केंव्हाही पडूदेत. काय फरक पडतो?"
"अस कस? माझा पहिला दात मग टूथ फेरी घेवून जाईल सोन्याचा करायला आणि मला गिफ्ट पण देईल."
"अच्चा म्हंजे तू गिफ्ट ची  वाट पाहते आहेस तर."
"हो ग आई. रेवाची ताई म्हणते कि टूथ फेरी वगैरे अस काही नसत. खर आहे का ग ते?" निरागसपणे सलोनीने मला विचारले. मला एक क्षण कळलेच नाही कि तिला काय उत्तर द्यावे? टूथ फेरी मी माझ्या लहानपणी पण ऐकली होती. आता त्यातला पोकळपणा मला कळत होता पण सलोनीला काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते. खर उत्तर देवून तिच्या भाव विश्वाला धक्का लावायची माझी इच्चा अजिबातच नव्हति.
"सांगना ग आई टूथ फेरी खरच असते का?" मी काही उत्तर देत नाही पाहून सलोनीने मला परत विचारले.
"मला नाही आठवत ग मला टूथ फेरी ने येवून मला काही गिफ्ट दिले होते का ते. आपण तुझ्या वेळी पाहूयात ती खरच असते का ते." असा सांगून मी वेळ मारून नेलि.
घराच्या, ऑफिसच्या कामाच्या नादात मी टूथ फेरीला विसरून पण गेले होते. ७ - ८ दिवस झाले असतील अचानक सलोनीच्या पाळणा घरातून मला ऑफिसमध्ये फोन आला. "आई आज आपल्याला कळेल टूथ फेरी असते कि नाही ते. माझा पहिला दात पडला आहे आणि मी तो घरी आणला आहे. बघू आज रात्री टूथ फेरी मला काय गिफ्ट देते?"
सलोनीचे बोलणे ऐकून मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. मला फक्त इतकच कळत होत कि टूथ फेरी बाबत सलोनी खूपच भावनिक झाली होती. माझा गोंधळ उडाला होता सलोनीला टूथ फेरी बद्दल खरी कल्पना द्यावी कि तीच तिला समजण्याची वाट पहावी,हेच कळत  नव्हते.
"आई बघ टूथ फेरी ने मला २० रुपये दिले आणि माझा दात घेवून गेलि." आनंदाने उठत सलोनीने मला २०  रुपये दाखवले.
"अग नाही खरच टूथ फेरी ने माझ्या उशीखाली ठेवले होते पैसे. माझ्या आईने पण पाहिले. " सलोनी तिच्या मैत्रिणीशी फोन वर बोलत होति. 
तिची ती निरागसता, माझ्यावरचा तिचा  विश्वास पाहून मला एकदम गलबलून आले. तीच भावविश्व जपताना कुठे तरी मी तिचा माझ्यावरच्या विश्वासाला तर तडा जावू देत नव्हते ना? उद्या तिला टूथ फेरी बद्दल खरे कळेल त्यावेळी तिला काय वाटेल? काळाच्या ओघात खरे काय आहेते कळतेच पण एकदा विश्वासाला तडा गेला कि तो परत मिळत नाही हा मोठ्ठा धडा टूथ फेरी मला देवून गेली होति.

आभार - लेखिका : राजश्री जोशी 

0 comments:

Post a Comment