Breaking News
Loading...
Friday, 12 June 2015

Info Post

ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा
तन मन फुलूवून जाती
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा
तन मन फुलूवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा
रंग सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले , स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे ||2||



ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बनू आले
लाट हि , वादळी , मोहुनी गाते
हि मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे , रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे

चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे ||2||

घेऊन ओले पंख आले रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेल हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन अंतर दरवळणारा
हि स्वर्ग सुखाची दारे
हे गीत प्रीतीचे

चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे ||2||

चित्रपट : बंध प्रेमाचे ( २००७ )
स्वर :  शंकर महादेवन
संगीतकार: अजय-अतुल
गीतकार: प्रविण दवणे
कलाकार :सुहास जोशी, विजय कदम आणि  ऐश्वर्या नारकर

>>  Download Mp3 <<


0 comments:

Post a Comment