चमचमत्या किनारीची,
तु कोरीव चांदणी,
गोर्या चेहर्यावर तुझ्या
नांदते हास्य नंदिनी
तू अशी कोमल,
फुलांची गंधराणी,
तुला पाहता दरवळे,
सुंगध मनोमनी..
तू अशी शीतल,
आळवावरचे पाणी,
तुला छेडीता
अंग घेतेस चोरूनी ..
तू अशी रंगाची
रंगेल ओढणी,
टिपक्यांच्या गर्दित,
नक्षी लपेटूनी..
तु अशी मऊ,
मखमल मृगनयनी,
ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता,
फिरतो मी वेड्यावानी..
तु अशी ओली
सरसर श्रावणी,
चिंब देहावर
नितळले मोत्याचे मणी..
तु अशी स्वप्नांची,
ऐकमेव राणी,
तुला आठवता
गातो मी गाणी..
तु अशी तु तशी
जिव गेला मोहरूनी,
छेडता तुला अवचित
गेलीस तू लाजूनी..
तू अशी तू तशी…
Info Post
0 comments:
Post a Comment