Breaking News
Loading...
Sunday, 14 March 2010

Info Post
मला पक्के ठाऊक आहे
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणुनच मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे.

तो प्रचंड वड कसा
उन्मलून पडला होता
म्हणें त्याला बिलगलेला
सायलीचा वृक्ष: कोणी खुडला होता.

मला माझीं हार मान्य आहे
म्हणजे तू जिंकलास असं होत नाही
डाव तुझ्या हाती दिला तरी
जिंकता तुला येत नाही.

परवा एक पाखरू रानात
आपले घरटं शोधत राहिलं
कसं सांगू त्याला त्याचे
घरटं पडताना मी पहिलं.

सगळेच वादळे मी खिडकीत
बसून पहिली, पण
परवाच्या वादळ!त,
माझी खिडकीच वाहून गेली.


इथे वेडं असण्याचे खुपसे
फायदे आहेत
शाहान्यांसाठी जगण्याचे,
काटेकोर कायदे आहेत.

झेपेल तेवढेच दुख:
तो आपल्याला देतो
म्हणे दिलेल दुख: संपले की
तो आपल्यालाच नेतो .

0 comments:

Post a Comment