Breaking News
Loading...
Friday, 4 December 2009

Info Post
अगं वेडे...मी तुझ्यावर प्रेम करतो...

ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस...
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'याद' येते.
नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?
हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.
अगं वेडे... मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो,
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.
अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.
येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.
तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.
तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो...

0 comments:

Post a Comment