Breaking News
Loading...
Monday, 22 March 2010

Info Post
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

स्वप्न दाखवून स्वप्न तोडतेस तू,
डोळ्यातून अश्रु काढतेस तू,
अन् पुन्हा तेच पुसायलाही येतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

विचारात नसलो तरी विचार करायला लावतेस तू,
दिवसादेखील चांदण्या दाखवतेस तू,
अन् सुर्यालाही चंद्र म्हणतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

आठवण बनून मनात येतेस तू,
मनालाही व्याकूळ करतेस तू,
अन् प्रेमाने पुन्हा तृप्त करतेसही तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

डोळ्याने इशारे करतेस तू,
नज़रेने सर्व काही बोलतेस तू,
अन् जवळ आल्यावर नज़रे आड़ करतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

0 comments:

Post a Comment