Breaking News
Loading...
Tuesday, 10 May 2011

Info Post
डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले  भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली 


किती फिरवशी मान आणखी,
किती हुंदके उरी कोंडशी
हसुनी आणिक डोळे पुसुनी,
किती स्वताला असे फसवशी 


विसरायचे म्हटलेस तरीही,
विसरशील का माझी प्रीती
कशी तुटतील जरी तोडशील,
अनाम संबंधाची नाती


वळणावरती मान फिरवुनी,
 कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे .......



साभार - कवियेत्री : भावना गायकवाड

0 comments:

Post a Comment