तुझे निळेपण आभाळाचे,
कालिंदीच्या गूढ जळाचे,
प्रसन्न सुंदर वा कमळाचे,
त्याची मज हो बाधा,
तुला शोधिते मी दिनराती,
तुजसि बोलते हरि एकांती,
फिरते मानस तुझ्याच भोवति,
छंद नसे हा साधा,
तुझ्याविना रे मजसि गमेना,
पळभर कोठे जीव रमेना,
या जगतासि स्नेह जमेना,
कोण जुळवि हा सांधा,
गीत - ग. दि. माडगूळकर,
संगीत - सुधीर फडके,
स्वर - आशा भोसले,
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
0 comments:
Post a Comment