Breaking News
Loading...
Friday, 16 August 2013

Info Post
प्रिय मित्रानो ..

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. म्हणून प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. असे हे ६७ वे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले गेले आणि निदान या दिवशी तरी  आपल्या  देशाचे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र वीरांचे  ऋण थोडे का होईना कमी व्हावे यासाठी प्रत्येकाने काहीतरी समाज हित पर काही कार्य करणे गरजेचे आहे.

मन माझे सेवाभावी संस्था आणि हेल्पिंग हैण्ड तर्फे आम्ही सुद्धा या वर्षी सुद्धा १५ ऑगस्ट २०१३ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्रित एक उपक्रम हाती घ्यायचे ठरवले. 




 दादर येथील बालीका आश्रम लहान मुलींच्या वस्तीगृहाला भेट देऊन तेथील चिमुकल्यांबरोबर आम्ही आपला वेळ व्यतीत केला.   तिथे पोचल्यावर राष्ट्र गीत बोलून झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. 




त्यानंतर आपला स्वातंत्र दिन केक कापून साजरा करण्यात आला..
मुलांना केक , फरसाण, चोकलेट्स  इत्यादिचे वाटप करण्यात आले...ज्याचा मुलांनी आनंदाने आस्वाद घेतला




 तदनंतर मुलांमधील कलागुण वाढवण्यासाठी चित्रकलेची स्पर्धा भरवण्यात आली 


मुलांना ड्राविंग पेपर , स्केच पेन , पेन्सिल , रबर , शार्पनर इत्यादीचे वाटप करण्यात आले. जे भेटल्यावर मुले खूपच खुश झाली  



मुलांमध्ये स्पर्धे विषयी खूपच उत्साह दिसत होता..मुलांना आवडेल त्या विषयावर चित्र काढण्यास सांगितले आणि सर्व मुले आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून वेगवेगळ्या विषयावर चित्रे काढू लागली 


सभासदांनी सुद्धा त्यांना जमेल तसे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. 


मुलांची चित्रे काढून झाल्यावर आम्ही एक छोटासा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा केला ...सामाजिक आणि भावनिकरित्या सर्वोपरी मदत करण्याचा आमचा तो एक छोटासा प्रयत्न होता ..रक्षा बंधनाचा कार्यक्रम समजल्यावर सर्व मुलींच्या चेहऱ्यावर अधिकच उत्साह आणि आनद दिसत होता ..ओवाळणी करून , गोड भरवून सर्व सभासदांना राखी बांधण्यात आली 




त्यानंतर चित्रकला स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले .प्रथम क्रमांकाची ३ पारितोषिके देण्यात आली 




तसेच ५ उत्तेजनार्थक पारितोषिके देण्यात आली 






सर्व मुलांना आमच्या तर्फे फळांचा वाटप करण्यात आला. 


तेथील एका चिमुकलीने अत्यंत छानरित्या निरोपाचे भाषण देवून कार्यक्रमाची सांगता केली




मित्रानो … आपल्या आयुष्यातील काही क्षण देवून , कोणाच्या ओठांवर थोडेसे हसू आणन्याशिवाय दुसरे कोणते आनंददायी काम नाही !!! :)


यापुढे सुद्धा आम्हाला तुम्हा सर्वांचा असाच योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!

आपल्या सर्वांना आमचा अनुभव कसा वाटला हे आपण आम्हास कळवू शकता तसेच या बालिका आश्रमाला भेट देवून वैयक्तिक रित्या वस्तू किंवा देणगी स्वरूपात सुद्धा मदत करू शकता!!
आभार
 मन माझे सेवाभावी संस्था

0 comments:

Post a Comment