रेडिओ - एफएम
संता :- डॉक्टर माझा मित्र स्वतःला रेडिओ समजतो आहे.
डॉक्टर :- तुम्ही काळजी करू नका मी त्यांचा इलाज करतो.
संता :- अहो मी काळजी करत नाहीये, फक्त तूम्ही असं काही करा की तो एफएम पकडेल.
हत्तीचे डासिणीवर प्रेम…
हत्तीचं डासिणीवर
एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला…. का?….
….
सांगा सांगा का?
अहो, ते म्हणाले, ”बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!”
सरदारजीला धमकी
सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -
सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत
पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?
सरदारजी - साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.
स्वयंपाक
बायको : अहो,काल तो भिकारी आला होता ना, तो मला अजिबात आवडला नाही.
नवरा : का ? काय केलं त्याने ?
बायको : काल मी त्याला चांगल भरपूर खायला दिलं,आज तो परत आला आणि तो मला हे “स्वयंपाक चांगला कसा करावा” पुस्तक देवून गेला.
घरजावई
पुजा - कायं गं लग्न करून घरजावई केल्यामुळे मजा येत असेल. चांगला धाक असेल. तुझ्या नव-यावर?
सुशिला - कुठला गं, उलट तेच माझ्यावर धाक दाखवतात, छोट्याशा गोष्टीवरून तेच माहेरी जायला निघतात.
सिंह आणि ससा हॉटेल मधे
एकदा एक सिंह आणि एक ससा हॉटेल मधे सोबत जातात.
वेटर दोघांनाही बसायला जागा देतो. सशाला विचारतो, ” सर, तुम्हाला खायला काय आणु “?
ससा सिंहासमोर ऎटीत सांगतो, ” माझ्यासाठी एक प्लेट गाजर आण, बघ चांगले हवेत. ”
वेटर घाबरत सिंहाकडॆ बघतो आणि विचारतो, ” सर, तुम्हाला काय आवडेल ?”
ससा त्याला सांगतो, ” त्यांना आज काहीही नको. ”
वेटर, ” कां ? त्यांना भूक नाही कां ?”
ससा, ” अरे, त्यांना भूक असती तर तुला काय वाटते मी इथे राहिलो असतो कां “?
सोपा मार्ग
दोन भिकार्याचा संवाद
पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.
दुसरा : काय नाव आहे त्याच ?
पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.
दुसरा : तर तु भिक का मागतोस ?
पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.
मराठी विनोद ...
Info Post
0 comments:
Post a Comment