Breaking News
Loading...
Sunday, 11 October 2009

Info Post
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो…
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते…
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते


पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!
Newer Post
Previous
This is the last post.

0 comments:

Post a Comment