Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

Info Post


नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका... तुटका होतो
जगण्याचे विरती धागे,
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
तुज वाचून जन्मच अडतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका...
- कवी संदीप खरे

0 comments:

Post a Comment