Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

Info Post
असाच आहे मी...
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला

मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

मला मी सांगू असा वाटतो ...

कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो

मला मी सांगू असा वाटतो ...

रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो....
अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो...आणि काय...

आणि खरच असाच आहे मी....

0 comments:

Post a Comment