Breaking News
Loading...
Thursday, 24 March 2011

Info Post

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'

 असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक  खास...

साभार - कवी : राहुल बाजी
गाव .............रसायनी, रायगड... 

0 comments:

Post a Comment