Breaking News
Loading...
Sunday, 10 January 2010

Info Post
तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही,काय करु,
तुझी आठवण मला झोपूच देत नाही,
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली,
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे,
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे,ती म्हणाली,
धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे,
उद्या आमच्या रुग्णालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो,
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो,
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली,
माघारी येताना हाती"डिसेक्शन बॉक्स"घेवून आली........
मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे,
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली,
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली,
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली,
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली........
तर माझी ही केस अशी आहे,
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे!!!!!

0 comments:

Post a Comment