Breaking News
Loading...
Tuesday, 10 November 2009

Info Post
कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना. 


प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय
मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय 


रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते 


प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली
संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली
समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी...  
Smiley  Cheesy

0 comments:

Post a Comment